फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूटचा दीक्षांत समारंभ सोहळा उत्साहात संपन्न

फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूटचा दीक्षांत समारंभ सोहळा उत्साहात संपन्न

पुणेप्रतिनिधी - फ्रेमबॉक्स २.० इन्स्टिटयूटतर्फे तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या समारंभात एकूण १०० हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सुभाजीत सरकारस्वप्नील इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदरील कार्यक्रम हा पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल सभागृहात संपन्न झाला. फ्रेमबॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी गुप्ताकंपनीच्या उपाध्यक्षा विनिता बचानी ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास चंद्र शेखर त्रिपाठीअंकित चौधरीरितेश कपूर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यंदा फ्रेमबॉक्सच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने "फेव्ह फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी गायनसंगीतनाटक आणि नृत्याचे सादरीकरण केले. 

विनिता बचानी म्हणाल्या की, "७० टक्के प्रात्यक्षिक आणि ३० टक्के कौशल्य शिक्षणावर आमचा भर आहे. केवळ पारंपरिक शिक्षण पद्धतीचा अवलंब न करता नोकरीभिमुक आणि उद्योगांना लागणाऱ्या कौशल्यांवर आमचा अभ्यासक्रम बनविण्यात आलेला आहे”. तसेच त्यांनी यावेळेस उपस्थितांना विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली."

रवी गुप्ता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत नाविन्यपूर्ण गोष्टी जोपासणे आवश्यक आहे. तसेच नवीन कल्पनातंत्रज्ञान आणि घडामोडींसह अद्ययावत राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सुभाजीत सरकार ह्यांनी काळानुसार बदलत चालेल्या परिवर्तनशील घटकांबाबत आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, “विकसनशील जगामध्ये सतत नव्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञानकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)जागतिक पातळीवरील डिजिटायझेशनचे रूपांतरण हे सर्व बदल लक्षात घेत भविष्यातील नवीन संधीसाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.”

WhatsApp Image 2023-12-13 at 3.08.12 PM

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

प्रशासनाचा तिसरा डोळा 'वादात'
भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही : मल्लिकार्जून खर्गे
देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? :  रमेश चेन्नीथला
Prajwal Revanna Case | शेकडो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा : अलका लांबा
आश्वासनांचा पाऊस आणि रोजगाराचा चिखल
मावळमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 37.50% टक्के मतदान
Shirur Loksabha Seat | बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क!
माजी मंत्री सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा
घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास