महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला ठोकले टाळे
कोल्हापूर : 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी कर्ज काढून, हात ऊसने घेवून सुक्ष्म सिंचन संच खरेदी केले आहेत, परंतु शासनाने पूर्वसंमती देऊनही आजतागायत त्यांना अनुदान प्राप्त झालेलं नाही. त्यामुळं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला आज टाळे ठोकले.
ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी, खत, वीज, मजुर यांची बचत करून शेतमालाचे अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळावे म्हणून शेतकरी सुक्ष्म सिंचन संचाचा अवलंब करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारव्दारे राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षात कर्जानं पैसे काढून, हात ऊसने घेवून सुक्ष्म सिंचन संच खरेदी केले आहेत. परंतु शासनानं पूर्वसंमती देऊनही संबंधित शेतकऱ्यांना आजतागायत अनुदान प्राप्त झालं नसल्यामुळं आर्थिक अडचण निर्माण झालीय. त्यामुळं आक्रमक झालेल्या आमदार सतेज पाटील यांच्यासह माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.
दरम्यान, २०२४-२०२५ करीता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती देऊन अनुदान मिळणेसाठी तातडीन कार्यवाही करावी, तसेच ठिबक आणि तुषार सिंचन संचाचे २०२३-२४ मधील प्रलंबीत अनुदान तात्काळ मिळण्याची मागणी महाविकास आघाडी कडून करण्यात आली.
000
Comment List