गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाला ५० व १०० रु. हफ्ता मिळावा
कोल्हापूर : मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला ३ हजार पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रूपये व ३ हजार पेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रूपये दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे केली.
सन २०२२ -२३ या हंगामातील ऊस दराचा हप्ता दोन महिन्यात शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरले होते. यानंतर काही साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देण्याबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवून ७ महिने झाले.मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ताधारी व विरोधी कारखानदारांच्या इशा-यावर राज्य सरकारकडून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लांबवून जाणीवपुर्वक दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.
चालू वर्षी महापुरामुळे गेल्या १५ दिवसापासून ऊस पिक पाण्यात बुडून मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सन २०२१ मध्येही महापूरात शेतक-यांची राखरांगोळी झालेली आहे. अशात जर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता जमा केला तर शेतक-यांना आधार होईल. एकीकडे शेतक-यांबद्दल कळवळा असल्याची नौटंकी राज्य सरकार करत आहे तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतक-यांचे राखरांगोळी करून कारखानदारांचे हित जोपासत आहे.
दुसरा हप्ता मिळण्यासाठी गेल्या सात महिन्यात मुख्यमंत्री यांना पाच वेळा व मुख्य सचिव यांची सहा वेळा भेट घेऊन वारंवार मागणी करूनही राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडले जात आहे. यावेळी यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक , जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे , राजाराम देसाई , आप्पा एडके , धनाजी पाटील , शिवाजी पाटील , मिलींद साखरपे , शैलेश आडके , राम शिंदे , सुधीर मगदूम, आण्णा मगदूम , भीमराव गोनुगुडे , संपत पवार यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
000
Tags:
Comment List