विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलन प्रकरणी १७ जणांना जामीन मंजूर
कोल्हापूर - विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आज (दि.६) १७ जणांना तब्बल तीन आठवड्यानंतर सशर्त जामीन मंजूर केला. तर सात जणांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. १४ जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विशाळगड अतिक्रमणमुक्ती मोहिमेला हिंसक वळण लागलं. यावेळी गजापूर, विशाळगड परिसरात घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत प्रचंड दगडफेक, तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी एकूण पाच गुन्हे नोंदवले होते.
तर २४ जणांना अटक करण्यात आली होती. यातील १७ जणांना आज न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलाय. यावेळी न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवभक्तांची देखील मोठी गर्दी झाली होती.
000
Tags:
Comment List