केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीबाबत महावितरणकडून मोठा खुलासा!

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीबाबत महावितरणकडून मोठा खुलासा!

कोल्हापूर – कोल्हापूरची अस्मिता असणारे ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागल्याने नाट्यगृह जाळून खाक झाले. त्यामुळे कोल्हापूरसह सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जातीय. ही आग शॉट सर्किटने लागल्याची माहिती समोर आल्यानंतर महावितरणने,” संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही”, असा मोठा खुलासा केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी पत्रकात म्हटलय की, “केशवराव भोसले नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा ही नाट्यगृहाच्या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत सुमारे १०० फूट अंतरावर आहे. तसंच महावितरणची जबाबदारी ही मीटरींग युनिट पर्यंत असते. तेथून पुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते. तसेच नाट्य गृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महानगरपालिकेकडून पाहिली जाते. सद्यस्थितीत नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची सर्व यंत्रणा सुस्थितीत आहे. त्यामुळे संबंधित आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही.”

000

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us