सेवानिवृत्त झालेले सुभेदार राजेंद्र संभाजी नरवडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने फुलांची पुष्पवृष्टी उत्साहात स्वागत!
रांजणगाव गणपती, प्रतिनिधी
भारतीय सैन्यदलात २४ वर्ष अखंड सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सुभेदार राजेंद्र संभाजी नरवडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने फुलांची पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
खंडाळे, ता.शिरुर येथील सेवानिवृत्त सुभेदार राजेंद्र संभाजी नरवडे यांची पुणे नगर महामार्गापासून खंडाळे गावापर्यंत सजवलेल्या गाडीमधून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जेसीबीच्या सहाय्याने प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी नरवडे यांचे अनोखे स्वागत केले.यावेळी मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम,आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जि.प.सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर,शिरूर खरेदी विक्री संघाचे माजी सभापती राजेंद्र नरवडे,सरपंच सुरेखा नळकांडे,चांगदेव नरवडे,मुक्ताबाई नरवडे, पत्नी दिपाली नरवडे,बंधू रमेश नरवडे, दिनेश नरवडे, विशाल नरवडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांनी परिसरातील वातावरणात आनंदी व स्फूर्तिदायी झाले होते. नरवडे यांच्या स्वागतासाठी गावातील प्रमुख चौका चौकामध्ये काढलेल्या रंगबेरंगी आकर्षक व सुंदर रांगोळ्या आणि घराच्या दारावर लावलेली तोरणे यामुळे गावामध्ये दसरा दिवाळी असल्याचे अनुभवयास येत होते.
सुभेदार नरवडे यांच्या घराजवळ मिरवणूक आल्यावर त्यांच्या पत्नी दिपाली व असंख्य माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून उस्फुर्त स्वागत केले तर त्यांच्या मातोश्री मुक्ताबाई नरवडे यांनी आनंदाश्रुंनी मोठ्या उत्साहात आपल्या सुपुत्राचे पेढा भरवत गळाभेट घेऊन स्वागत केले.यावेळी शिवव्याख्याते आकाश वडघुले यांनी सेवानिवृत्त सुभेदार नरवडे यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश वडघुले यांनी केले.तर रमेश नरवडे यांनी आभार मानले.
000
Tags:
Comment List