महागणपती मंदिरात विनायकी चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न!
रांजणगाव गणपती, प्रतिनिधी
अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, ता. शिरुर येथील महागणपती मंदिरात विनायकी चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आज विनायकी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता अभिषेक तर सकाळी ७ वाजता गणेश याग आणि १० वाजता सत्यविनायक पूजा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर व राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते झाला. विनायकी चतुर्थी निमीत्त दुपारी १२ वाजता मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.तसेच महागणपतीस माजी मुख्य विश्वस्त कै.वसंतराव देव यांच्या प्रित्यर्थ महागणपतीस १००१ संत्र्यांचा महानैवेद्य तसेच गणेशभक्त राजेंद्र नवले यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने विनायकी चतुर्थी निमित्त भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा पाचुंदकर यांनी दिली.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ.ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ.तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव आदीसह भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
000
Tags:
Comment List