संभाजीराजे छत्रपती राज्यात उभारणार तिसरी आघाडी

राजरत्न आंबेडकर साथीला तर बच्चू कडू, मनोज जरांगे यांच्याशी चर्चा

संभाजीराजे छत्रपती राज्यात उभारणार तिसरी आघाडी

मुंबई: प्रतिनिधी 

राज्यातील राजकारण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या भोवती केंद्रित झालेले असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिसऱ्या आघाडीच्या रूपाने मतदारांना नवा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे देखील यावेळी उपस्थित होते. 

महाराष्ट्र सुसंस्कृत राहिला आहे का? 

प्रचलित राजकारणाचा संदर्भ देताना, आजचा. महाराष्ट्र सुसंस्कृत राहिला आहे का, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. राज्यातील राजकारण म्हणजे नळावरचे भांडण झाले आहे. वैयक्तिक द्वेष हाच सध्याच्या राजकारणाचा आधार आणि उद्देश बनला आहे. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठीच आपण तिसऱ्या आघाडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

... या एकाच नाण्याच्या दोन बाजू 

महायुती आणि महाविकास आघाडी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका संभाजी राजे यांनी केली. संविधान धोक्यात असल्याची आवई उठवून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात उल्लेखनीय यश मिळविले. मात्र, प्रत्यक्षात संविधान धोक्यात येते त्यावेळेला सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे धारिष्ट्य महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी दाखवलेले नाही. ज्यावेळी वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल केले, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला त्यावेळी महाविकास आघाडीने काहीही केले नाही, असा आक्षेपही संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीतील निकालांच्या आधारावर जर कोणाला असे वाटत असेल की विधानसभा निवडणुकीच्या निकालात त्याची पुनरावृत्ती होईल, तर ते चुकीचे ठरेल, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीला दिला. 

कोण असणार तिसऱ्या आघाडीचे शिलेदार? 

तिसऱ्या आघाडीची बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर आमच्याबरोबर आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते सध्या विविध पर्यायांची चाचपणी करत असून लवकरच त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे प्रहार संघटनेचे बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशा अनेक नेत्यांची आपण संपर्क साधून आहोत, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले. 

 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'पाडीपाडीचे राजकारण करू नका'
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गळाला
'शिंदे- पवार यांच्यातील बेबनावाच्या बातम्या हा विरोधकांचा कट'
डहाणूमध्ये मनसेने पाडले काँग्रेसला खिंडार
'... यांचे प्रेम नाही तर अफेअर, केव्हाही तुटू शकेल'
हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पक्षातील निष्ठावंतांचे आव्हान
भाजपचा मोठा मासा शरद पवार यांच्या गळाला
राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दाऊद मुल्ला |
म्हसवड येथे सुरु होणार अप्पर तहसिल कार्यालय |
'महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात'