तृथीयपंथीयाच्या खुनाचा म्हसवड पोलीसांनी लावला अवघ्या ६ तासांत छडा, आरोपी ताब्यात!

तृथीयपंथीयाच्या खुनाचा म्हसवड पोलीसांनी लावला अवघ्या ६ तासांत छडा, आरोपी ताब्यात!

म्हसवड

म्हसवड पालिका हद्दीतील मसाईवाडी - पानवण रस्त्यालगत असलेल्या एका विहीरीत दि.१३ रोजी सकाळी एक मृत्युदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगत असल्याची शहरात एकच चर्चा सुरु असताना पोलीसांनी घटनास्थळी जावुन प्रत्यक्षात पाहणी केली असता एका महिलेचा मृत्युदेह विरीरीवरील पाण्यावर तरंगताना दिसुन आल्याने पोलीसांनी तात्काळ घटनास्थळावर पंचनामा करुन याची नोंद पोलीस दप्तरी करीत तपासाला सुरुवात केली. 
ज्या विहीरीत हा मृत्युदेह आढळुन आला ती विहीर शहरापासुन दुर असलेल्या मसाईवाडी परिसरातील पानवण रस्त्यालगत निर्जन स्थळी असुन मुृत्युदेहाची पोलीसांनी तपासणी केली असता त्या मृत्युदेहावर काही ठिकाणी खोलवर जखमा तर गळ्यावरही तीक्ष हत्याराने वार केल्याप्रमाणे जखम आढळुन आल्याने सदर व्यक्तीचा खून झाल्याचा पोलीसांचा संशय बळावला त्यांनी त्वरित ही बाब उपविभागिय पोलीस अधिकारी अश्वनी शेंडगे यांना कळवली, सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन शेंडगे यांनी स.पो.नि. सखाराम बिराजदार यांना योग्य त्या सुचना देत तपासाची जोरदार चक्रे फिरवत अवघ्या ६ तासांत दिवड ता. माण येथील समाधान विलास चव्हाण यास त्याच्या शेतातुन ताब्यात घेतले. 

याबाबत पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी की मयत राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय ( २५ ) यांचे प्रेमसंबध होते, राशी हा तृथीयपंथी होता तो सतत समाधान चव्हाण यास माझ्यासोबत लग्न कर असे म्हणुन त्याचा मागे सतत तगादा लावत होता तर राशी हा तृथीयपंथी असल्याने समाधान हा सतत त्याला टाळत होता, मात्र राशी काही केल्या ऐकत नसल्याने समाधान याने तिचा कायमचा काटा काढायचे ठरवुन रविवार दि.८ ऑगष्ट रोजी राशीला सोबत घेवुन येथील मसाईवाडी परिसरातील नागोबा - पानवण रस्त्यालगत आला त्याठिकाणी समाधान याने राशी हिचा गळा आवळुन खुन केला व नंतर तिचा मृत्युदेहाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळुन त्याच्यासोबत एक दगड बांधला अन् तो मृत्युदेह जवळच असलेल्या एका विहिरीत टाकला त्यानंतर तो आपल्या मोटारसायकलवरुन निघुन गेला. तीन, चार  दिवसांनी विहीरीतील तो मृतुदेह फुगुन पाण्यावर तरंगु लागला त्यानंतर याची खबर पोलीसांना लागताच पोलीसांनी मृत्युदेहाच्या अंगावरील खुनांवरुन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता तो मृत्युदेह हा मोटेवाडी ता. माण येथील राशी उर्फ राहुल घुटुकडे याचा असल्याचे निष्पन्न‌ झाले. तद्नंतर पोलीसांनी आपल्या गोपनीय खात्यामार्फत व खबर्यांकडुन याची माहिती मिळवली तेव्हा दिवड येथील समाधान चव्हाण व मयत घुटुकडे यांचे प्रेमसंबध असल्याचे समोर आल्यावर दि.१४ रोजी पोलीसांनी अत्यंत शिताफीने संशयीत समाधान चव्हाण यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे पोलीसांनी कसुन चौकशी केली असता त्याने सदर खुनाची कबुली म्हसवड पोलीसांना दिली. या खुनाच्या तपासकामी उपविभागिय पोलीस अधिकारी अश्वनी शेंडगे, स.पो.नि. सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अंमलदार शशीकांत खाडे, अभिजीत भादुले, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, नवनाथ शिरकुळे, जगन्नाथ लुबाळ, अनिल वाघमोडे, कवडे, वासीम मुलाणी,व श्रीकांत सुद्रीक यांनी विशेष परिश्रम घेतल्याने त्यांचे सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

०००IMG-20240914-WA0006IMG-20240914-WA0005

 

Share this article

Tags:

About The Author

Mahesh Kamble Picture

म्हसवड तालुका प्रतिनीधी 

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'पाडीपाडीचे राजकारण करू नका'
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गळाला
'शिंदे- पवार यांच्यातील बेबनावाच्या बातम्या हा विरोधकांचा कट'
डहाणूमध्ये मनसेने पाडले काँग्रेसला खिंडार
'... यांचे प्रेम नाही तर अफेअर, केव्हाही तुटू शकेल'
हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पक्षातील निष्ठावंतांचे आव्हान
भाजपचा मोठा मासा शरद पवार यांच्या गळाला
राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दाऊद मुल्ला |
म्हसवड येथे सुरु होणार अप्पर तहसिल कार्यालय |
'महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात'