पर्वतीत परिवर्तन घडवून आणा: आबा बागुल यांचे आवाहन
वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित पुणे हाच संकल्प असल्याची नागरिकांना ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. राज्यात काय पुणे शहरातही कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिव हैसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात वाहतूक कोंडी मुक्त शहर व महिलांसाठी सुरक्षित पुणे, हाच संकल्प असून त्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी दिली. पर्वती विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन घडवून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.
आबा बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वती विधानसभा मतदारसंघात शिवदर्शन येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात नागरिकांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना आबा बागुल यांनी हा संकल्प जाहीर केला. यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्रीताई बागुल, पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, कपिल बागुल, अमित बागुल, हेमंत बागुल यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आबा बागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची अभूतपूर्व गर्दी होती. तसेच, आता आबा आमदार झालेच पाहिजे,' अशी मागणी उपस्थित नागरिकांकडून केली जात होती.
नागरिकांच्या भावना लक्षात घेत आबा बागुल म्हणाले, आजवर महापालिका निवडणुकीत सलग सहावेळा नागरिकांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ केला आहे. आज वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेले प्रेम हे कधीही विसरू शकणार नाही. यंदा मी आमदार होणारच, असे स्पष्ट करताना आबा बागुल म्हणाले, आज शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. राज्यात काय पुणे शहरातही कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कोयता गॅंगचा उद्रेक वाढला आहे. हे पाहता, वाहतूक कोंडीमुक्त शहर व महिलांसाठी सुरक्षित पुणे हाच संकल्प मी सोडला आहे आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठीच मी कटिबद्ध आहे. आमदार झाल्यावर प्राधान्याने हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Comment List