'मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास त्याला फडणवीस जबाबदार'

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

'मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास त्याला फडणवीस जबाबदार'

जालना: प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण पुन्हा उपोषण सुरू करणार असून हे आंदोलन ही राज्य सरकारला शेवटची संधी असेल. यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे, आरक्षणात सगेसोयऱ्यांचा समावेश व्हावा, हैदराबादसह तीन गॅझेट प्रमाण मानावे, या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे पाटील आज रात्री बारा वाजल्यापासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. त्यापूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला अनेक इशारे दिले. 

यापुढे करणार नाही राजकीय भाष्य  

आपण पुन्हा उपोषण सुरू करणार असून केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आपली मागणी आहे. आपल्याला राजकारण करण्यात कोणताही रस नाही. मात्र, आम्ही राजकारण करू नये अशी इच्छा असेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्या. आम्हाला निवडणुकीची काही देणे घेणे नाही. त्यामुळे इथून पुढे आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये भावा, या मागणीसाठी पंढरपूर येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने धनगर, धनगड, धनखड एकच असल्याचा शासकीय आदेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे. धनगर समाजाच्या या मागणीला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे दंगली घडविण्याच्या विचारात असून त्यांच्याशी भांडण ओढवून घेऊ नका, असा सल्लाही त्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना दिला आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'पाडीपाडीचे राजकारण करू नका'
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या गळाला
'शिंदे- पवार यांच्यातील बेबनावाच्या बातम्या हा विरोधकांचा कट'
डहाणूमध्ये मनसेने पाडले काँग्रेसला खिंडार
'... यांचे प्रेम नाही तर अफेअर, केव्हाही तुटू शकेल'
हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पक्षातील निष्ठावंतांचे आव्हान
भाजपचा मोठा मासा शरद पवार यांच्या गळाला
राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दाऊद मुल्ला |
म्हसवड येथे सुरु होणार अप्पर तहसिल कार्यालय |
'महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात'