अल्पवयीन मुलांकडून पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पहात दुष्कर्म करणारे जेरबंद
शिरवळ: प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात पाच वर्षीय बालिकेवर मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या अत्याचार प्रकरणी प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिरवळ पोलिस याबाबत चौकशी करून पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवारी (दि.१६) रोजी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून संबंधित दोन्ही नराधम आरोपीना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून शिरवळ परिसरातील एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. चार वर्षीय मुलगी संबंधित मुलांकडे खेळायला जात असे. रविवारी ( दि.१५) रोजी पिडीत व आरोपी हे एकत्र खेळत असताना पीडितेला आरोपीने घराच्या टेरेस वर नेत मोबाईल मधील अशील क्लिप पहात अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या नंतर झालेली घटना पीडितेने आपल्या आईला सांगितली. याबाबत शिरवळ पोलिसांना माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती घेतली व आपली तपासचक्र फिरवत आरोपीला ताब्यात घेतले. यानंतर पीडित मुलीच्या आईने शिरवळ पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत तक्रार दाखल केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक नयना कामठे करीत आहेत.
Comment List