राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दाऊद मुल्ला |
म्हसवड दि. १०
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी म्हसवड येथील युवा नेते दाऊद मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली असुन नुकतेच त्यांना सदर निवडीचे नियुक्तीपत्र सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार अण्णा यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी , माजी सभापती जिल्हा एस.सी विभाग उपाध्यक्ष विजय बनसोडे, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दाऊद मुल्ला हे गत २० वर्षापासुन कॉंग्रेस चे कार्यकर्ते म्हणुन म्हसवड पंचक्रोशीत सुपरिचीत आहेत. सर्वसामान्यांचा आवाज अशी त्यांची विशेष ओळख असुन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार्या मुल्ला यांच्या सदर निवडीमुळे सर्वसामान्य वर्गातुन त्यांचे अभिनंदन होत आहे, तर राष्ट्रीय कॉंग्रेस ने आपणाला दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण यापुढे आणखी जोमाने काम करणार असल्याचे सांगत मुल्ला यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की ज्या मध्ये सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित काम करीत असुन हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे म्हटले आहे.
मुल्ला यांच्या निवडीमुळे त्यांचे सामान्य जनतेसह विविध क्षेत्रातील मान्यवरानी अभिनंदन केले.०००
Comment List