प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने अरविंद पिसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल |
म्हसवड
माण विधानसभा मतदार संघातुन प्रहार जनशक्ति पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद बापु पिसे यांनी अगदी साध्या पध्दतीने कुटुंबियांसोबत काही ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दहिवडी येथील तहसिल कार्यालयात जावुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पुर्वी पिसे यांनी म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथ मंदिरात जावुन आपल्या कुटुंबियासोबत दर्शन घेतले त्यानंतर म्हसवड येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत त्यांनी दहिवडी येथे अर्ज भरण्यासाठी प्रस्थान केले, यावेळी त्यांच्या समावेत त्यांच्या सुवैद्य पत्नी सारिका पिसे, मुलगी तृप्ती, मुलगा आदित्य यासह अभिजीत धट, सारंग धट, अँड. निसार काझी, जोतीराम लोखंडे, फिरोज सय्यद, संतोष पिसे, अमोल पिसे, सुशील सरतापे, शब्बीर काझी आदीजण उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर पिसे यांनी माध्यमांशी सवांद साधताना सांगितले की माझ्यासमोर मोठ्या पक्षाचे मोठे नेते विरोधात उभे आहेत, आमचा पक्ष जरी छोटा असला तरी आमची माणसे मोठ्या मनाची आहेत, मी सर्वसामान्य जनतेसाठी गेली ७ वर्ष काम करीत आहे, आमचे नेते बच्चु कडु यांच्या मार्गदर्शनाखाली मी माण - खटाव मधील हजारो दिव्यांग, बांधकाम कामगार, निराधार, जेष्ठ नागरिक, परितक्त्या महिला आदींसाठी अहोरात्र काम करीत असुन हीच माझी ताकत आहे. माझ्या विरोधात मोठी धनशक्ती उभी आहे याची मला पुर्ण कल्पना आहे तरी ही माझा माझ्या मतदारांवर व माझ्या कामावर पुर्ण विश्वास असुन माझा मतदार हा मतपेटीतच दिसुन येईल शेवटी मतपेटीतुनच नव्या राजाचा जन्म होतो तसाच माझाही होईल.
अरविंद पिसे यांच्यासाठी दिव्यांगाचीही उपस्थिती -
प्रहार जनशक्ति पक्ष हा दिव्यांगासाठी काम करणारा पक्ष म्हणुन राज्यात ओळखला जातो, या पक्षाचे काम पाहुनच अरविंद पिसे यांनी पक्षप्रमुख आ. बच्चु कडु यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ति पक्षात प्रवेश करुन माण - खटावमधील दिव्यांग बांधवांसाठी गत ७ वर्ष अविरतपणे काम सुरु केले आहे त्यामुळे पिसे हे प्रहार जनशक्ति पक्षातुन अर्ज भरणार असल्याचे जाहीर होताच त्यांच्या उमेदवारीचे स्वागत दिव्यांग बांधवांनी करीत त्याच्यासोबत अर्ज भरण्यासाठी दहिवडी गाठली.
०००
Comment List