आ. जयकुमार गोरे यांचे ऊरात धडकी भरवणारे शक्तीप्रदर्श |
म्हसवड दि. २९
माण विधानसभा मतदार संघातुन भाजपकडुन आ. गोरे यांनी आपल्या समर्थकांसोबत दहिवडी येथील तहसिल कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी आ. गोरे यांनी केलेले शक्ति प्रदर्शन पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या तर त्यांचे शक्ति प्रदर्शन हे उरात धडकी निर्माण करणारे ठरले आहे.
२५८ माण विधानसभा मतदार संघात निवडणुकीची मोठी चुरस निर्माण झाली असुन अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, आ. जयकुमार गोरे हे येथील विद्यमान लोकप्रतिनिधी असुन ते गत १५ वर्षापासुन सलग तीन वेळा येथुन आमदार म्हणुन निवडुन जात आहेत, यंदाही ते भाजपकडुन विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. आ. गोरेंचा विजयीरथ रोखण्यासाठी त्यांचे राजकिय विरोधक प्रत्येक निवडणुकीत मोठे जाळे विनत आहेत मात्र प्रत्येक निवडणुकीत आ. गोरे हे विरोधकांचे ते जाळे फाडुन विजयश्री खेचुन आणत आहेत. गतवेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या राष्ट्रवादीने एकत्र येत अपक्ष असलेल्या प्रभाकर देशमुख यांना एक मुखी पाठींबा दिला होता त्यावेळी निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली होती त्यावेळीही आ. गोरेंनी ती निवडणुक काही हजारांच्या मताधिक्याने जिंकली होती. आ. गोरे म्हणजे लंबी रेस का घोडा आहे हे ओळखुनच भाजपने यंदा पुन्हा एकदा येथुन त्यांना उमेदवारी दिली आहे. आ. गोरे हे गत १५ वर्षापासुन माण - खटावचे प्रतिनिधीत्व करीत असुन त्यांनी आजवर विविध विकासकामे करताना माण - खटावला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे, त्याचेच फलित म्हणुन माणची माणगंगा व खटावची येरळा नदी आता भरभरुन वाहत असल्याचे चित्र आहे. आ. गोरे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता अशी सर्वसामान्य जनतेची धारणा असल्यानेच सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर आ. गोरेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सामान्य जनतेला नेमके काय हवे आहे, त्यांच्या समस्या काय आहे याची नेमकी माहिती आ. गोरेंना असल्यानेच आ. गोरेंवर सामान्य जनता प्रेम करीत आली आहे. आ. गोरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सामान्य जनतेला एकच आवाहन केले अन् दहिवडीला अक्षरशा जत्रेचे स्वरुप आल्याचे दिसुन आले. सोमवारी आ. गोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांना समर्थन दर्शिवण्यासाठी आलेल्या हजारोंच्या संख्येने दहिवडी जाम झाली. आ. गोरे अन् गर्दी हे जणु एक समीकरणच झाले असल्याने आ. गोरेंचा करिश्मा यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत हमखास दिसुन येणार यात शंका नाही.
चौकट -
ये तो एक झाकी है, निवडणुक तो अभी बाकी है -
आ. गोरेंनी निवडणुकीचा अर्ज भरताना केलेले शक्ति प्रदर्शन हे खरोखरच थक्क करणारे ठरल्याने ये तो एक झाकी है, निवडणुक तो अभी बाकी है असेच त्यांचे कार्यकर्ते यावेळी म्हणत होते.
प्रभाकर देशमुख ऐवजी प्रभाकर घार्गे -
आ. जयकुमार गोरेंचा विजयी वारु रोखण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडुन सुरुवातीला आ. गोरेंचे गतवेळचेचे प्रतिस्पर्धी असलेले प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते, मात्र पक्षातील अंतर्गत कलहामुळे देशमुख यांनीच निवडणुकीतुन माघार घेतल्याने पक्षाने आता प्रभाकर घार्गे यांना येथुन उमेदवारी दिली आहे.
माण विरुध्द खटाव असा रंगणार सामना -
यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आ. गोरेंच्या विरोधात महा विकास आघाडीकडुन माजी आ. प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देत नवे आव्हान देण्याचा प्रयत्न केला असुन आ. गोरे हे माणचे रहिवाशी आहेत तर माजी आ. घार्गे हे खटाव तालुक्यातील रहिवाशी आहेत, घार्गे यांच्या निमीत्ताने मतदार संघाच्या विभागणीनंतर प्रथमच खटाव तालुक्यातील व्यक्तीला विधानसभेसाठी संधी मिळाली असल्याने माजी आ. घार्गे यांच्या उमेदवारीचे खटावकरांतुन जोरदार स्वागत केले जात आहे, तर माणदेशी जनता ही आ. गोरेंच्या पाठीशी आजवर मोठ्या ताकतीने उभी राहिलेली आहे त्यामुळेच यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत माण विरुद्ध खटाव असा सामना पहायला मिळेल असे राजकिय जानकार बोलत आहेत.
प्रहार जनशक्ति पक्ष डोकेदुखी वाढवणार -
प्रहार जनशक्ति पक्षाने यंदा प्रथमच माण विधानसभा मतदार संघातुन प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या अरविंद पिसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पिसे यांनी गत ७ वर्षापासुन प्रहारचा झेडा हाती घेत दिव्यांग, निराधार, बांधकाम कामगार, जेष्ठ नागरिक व परितक्त्या आदींसाठी मोठे काम केले असुन त्यांच्या पाठीशी या सर्वांच्या एकीची मोठी ताकत आहे, तर पिसे यांच्या रुपाने प्रथमच म्हसवड शहराला विधानसभेचे तिकीट मिळाले असल्याने म्हसवडकरही खुष झाले आहेत, तर पिसे हे सुध्दा निवडणुकीत चांगले आव्हान निर्माण करतील असा विश्वास प्रहारच्या कार्यकर्त्यांना वाटत असल्यानेच प्रहार जनशक्ति पक्ष हा कोणाची डोकेदुखी वाढवणार हे निवडणुक काळात समजणार आहे.०००
Comment List