लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत वडगाव शेरी मतदार संघात सुनील टिंगरे यांनी अर्ज केला दाखल

जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील टिंगरे यांचा अर्ज दाखल

येरवडा : लाडक्या बहीणांना समवेत घेऊन आणि दुचाकी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघातून शक्ती प्रदर्शन करीत वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत महायुतीचे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी धानोरी गाव येथील ग्राम दैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आमदार सुनिल टिंगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित दुचाकी रॅलीला सुरवात झाली. धानोरी, विश्रांतवाडी, नागपूर चाळ मार्ग येरवडा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी मतदार संघातील सर्व भागातील नागरिक आणि महिला उस्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. त्यात तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सेनेच्या नेहा शिंदे, सुनील जाधव, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, भाजपचे माजी नगरसेवक सुनिता गलांडे, संदीप जराड, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका उषा कळमकर, मीनल सरोदे, चंद्रकांत टिंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. लाडक्या बहिणींची उपस्थिती ठरली लक्षवेधक... आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या लाडक्या बहीणची उपस्थिती लक्षवेधक होती. महायुती सरकारची महिलांसाठी लोकप्रिय असलेली लाडकी बहिण योजनेचा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांना लाभ मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गाने आपली उपस्थिती दाखवत आभार व्यक्त केले. ————— गेल्या पाच वर्षात मतदार संघात दिड हजार कोटींची विकासकामे केली. त्या विकास कामांच्या जोरावर सर्व घटकाना समवेत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ. विरोधकांकडे मुद्देच नसल्याने ते चिखल फेक करीत असले तरी आमचा अजेंडा मतदार संघाचा विकास हाच राहील. त्याच जोरावर या निवडणुकित निश्चित पणे यश मिळवू. आमदार सुनिल टिंगरे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, वडगाव शेरी


Share this article

Tags:

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

२० तासांहुन अधिक काळ चालले दिवाळी मैदान |
माझे संरक्षण काढले तरी चालेल, पोलिसांनी जनतेला संरक्षण द्यावे - सुनील शेळके
वडगावात रविवारी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराचा शुभारंभ
गावाच्या विकासासाठी कशाळ ग्रामस्थांचा आमदार सुनील शेळके यांनी एकमुखी पाठिंबा
मावळात तरुणांची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ
Vadgoan Maval | मावळात महायुतीचा धर्म पाळणार,– खासदार श्रीरंग बारणे 
छाननीत १२ जणांचे उमेदवारी अर्ज वैध;तर ६ जंणाची उमेदवारी रद्द
पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार;आमदार सुनिल शेळके
लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत वडगाव शेरी मतदार संघात सुनील टिंगरे यांनी अर्ज केला दाखल
"भाजपसमोर निष्ठावान कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान"